दारूच्या नशेत पतीने पत्नीला पाजले उंदीर मारण्याचे औषध : जामनेर तालुक्यातील धक्कादायक प्रकार
Drunken husband feeds his wife with rat-killing drug: Shocking incident in Jamner taluka जामनेर : दारूच्या नशेत पत्नीला उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचाक प्रकार जामनेर तालुक्यातील ओझर गावात घडला. या संदर्भात पतीविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दारूच्या नशेत पाजले उंदीर मारण्याचे औषध
कमलाबाई दिगंबर शेगर ही महिला आपले पती दिगंबर तुकाराम शेगर यांच्यासह वास्तव्याला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद होता. शुक्रवार, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. यामध्ये दारूच्या नशेत दिगंबर तुकाराम शेगर यांनी पत्नी कमलाबाई शेगर यांना मारहाण करून गंभीर दुखापत केली तसेच त्यांना जीवेठार मारण्याचे उद्देशाने त्यांच्या तोंडात उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजले. दरम्यान कमलाबाई यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांचे प्रकृती आता स्थिर आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती दिगंबर तुकाराम शेगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे हे करीत आहे.


