कुसूंब्यातील तरुणावर प्राणधातक हल्ला : पाच संशयितांना एमआयडीसी पोलिसांकडून अटक


Assault on youth in Kusumba : Five suspects arrested by MIDC police जळगाव : जुन्या वादातून कुसुंबा येथील एका तरूणावर चॉपर, लोखंडी रॉड आणि दगडांनी मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आल्याची घटना रविवार, 4 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पाचही आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली.

जुन्या वादातून हल्ला
रवींद्र बाबूराव पवार (36) हा तरूण जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे वास्तव्याला आहे. त्याचा चुलत भाऊ राजेश जगराम पवार याने गावातील काही जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा राग मनात ठेवून रविवार, 4 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाता पवार हा एमआयडीसीतील अरिहंत जैन बेकरीजवळून जात असतांना योगेश दीपक पाटील, सागर अशोक कोळी, अक्षय शांताराम कोळी, अजय बापू परधी आणि भारत कारभारी चांदेाडे उर्फ बंटी गुजर (सर्व रा. कुसुंबा) यांनी रस्ता आडविला. पाचही जणांनी चॉपर, लोखंडी रॉड आणि दगडांनी रविंद्र पवार याला शिवीगाळ करून बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी सोमवारी 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !