जळगावातील उपजिल्हाधिकार्‍यांवर हल्ला : सहा आरोपींना अटक


Attack on Sub-District Officer in Jalgaon: Six accused arrested जळगाव : जळगावातील निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला करणार्‍या सहाा वाळू माफियांना अटक करण्यात आली. वाळू माफियांनी कासार यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार, 6 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोन जणांना त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पसार सहा आरोपींनी अटक करण्यात आली.

सहा संशयितांची पोलिस कोठडीत रवानगी
गुरूवारी 8 फेब्रुवारी रोजी सहा जणांना न्यायमुर्ती श्रीमती एम.एम.बढे यांनी सोमवार, 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार बनसोडे हे तरसोद फाट्याजवळ मंगळवार, 6 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास वाळूचे डंपरवर कारवाई करण्यासाठी गेले असतांना अचानक त्यांच्यावर वाळूमाफियांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला.



या आरोपींना अटक
निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड टाकल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर मारेकरी पसार झाले होते. यातील गौतम यशवंत पानपाटील (38, रा.सावखेडा, ता.जि.जळगाव) आणि विठ्ठल भगवान पाटील (36, रा.ज्ञानदेव नगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी बुधवार, 7 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता पोलिसांनी कारवाई करत पवन उर्फ प्रसाद कैलास कोळी (23, रा.साकेगाव), प्रवीण सुकलाल चौधरी (25), निखील गोपाल कच्छवा (20, दोन्ही रा.पिंप्राळा, ता.जि.जळगाव), मंगेश यशवंत पानपाटील (25, रा.सावखेडाम), जगदीश प्रमोद तायडे (19, रा.साकेगाव) आणि अजय मुलचंद चौधरी (28, रा.पिंप्राळा) यांना अटक करण्यात आली. अन्य संशयितांचा कसून शोध सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !