राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या भुसावळ शहराध्यक्षपदी शेख वसीम शेख इब्राहिम
Sheikh Wasim Sheikh Ibrahim as Bhusawal City President of NCP Youth Congress
भुसावळ : भुसावळ शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी पापा नगरातील रहिवासी शेख वसीम शेख इब्राहिम यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्षाची ध्येय-धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष बळकटी करणासह युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याची ग्वाही शेख वसीम यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया तसेच रावेर लोकसभा जिलहाध्यक्ष उमेश नेमाडे, भुसावळ शहर अध्यक्ष संतोष दाढी आदींच्या उपस्थितीत शेख वसीम यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.








