बँक मॅनेजरसह दोघांना मारहाण करीत लूटले : चाळीसगाव तालुक्यातील घटना


Bank manager and two were beaten up and robbed : Incident in Chalisgaon taluka चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या मॅनेजरसह दोघांना बेसबॉलच्या दांड्याने मारहाण करीत लूटण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे लूट प्रकरण
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गणेशपूर शाखेचे मॅनेजर हे कर्मचारी महेंद्र दत्तात्रय पाटील (34, हिरापूर रोड, नवीन नाक्याजवळ, चाळीसगाव) हे शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास गणेशपूर शाखेवर कामांवर जात असताना खडकीजवळील पुलाचे काम चालू असल्याने वळण रस्त्यावरील गणेशपूरकडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर निर्जन ठिकाणी स्प्लेंडर दुचाकीवरील दोघांनी हात देवून दुचाकी थांबवल्यानंतर महेंद्र पाटील यांच्या हातावर व पायावर बेसबॉलने मारहाण केली तसेच एअरगनसारख्या दिसणार्‍या नकली शस्त्राचा बँक मॅनेजर यांना धाक दाखवून त्यांच्याकडील 15 हजारांची रोकड व बँकेच्या चाव्या, अन्य कागदपत्र असलेली बॅग हिसकावून पोबारा केला. याबाबत चाळीसगाव पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !