समझोता करण्यासाठी बोलावून तरुणावर शस्त्राने हल्ला : जळगाव तालुक्यातील घटना
Attack on youth with weapon after calling for settlement : incident in Jalgaon taluka जळगाव : आपल्यात समझोता करायचा आहे, असे मोबाईलवर सांगून बोलावल्यानंतर संशयिताने कानशीलात लगावली व सोबतच्या साथीदाराने धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जखमी केले तर अन्य दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना बुधवार 7 रोजी रात्री 8.40 वाजेच्या सुमारास रायपूर फाटा बस स्टॅण्डजवळ घडली. या घटनेत विजय उर्फ दादु पाटील (18) कुसुंबा हा जखमी झाला.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
याप्रकरणी तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात ऋषीकेश पाटील, चेतन कोळी, गणेश कोळी (कुसुंबा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे व पोलिसांनी जावून माहिती घेतली. तपास नाईक सुनील सोनार करीत आहेत.


