जळगावातील हद्दपार आरोपी तलवारीसह जाळ्यात
Deported accused from Jalgaon in net with sword जळगाव : हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण करीत शहरात आलेल्या आरोपीला तलवारीसह पकडण्यात आले. ही कारवाई जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली. विशाल मुरलीधर दाभाडे (रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
विशाल दाभाडे हा आरोपी दोन वर्षांसाठी हद्दपार असून आदेशाचे उल्लंघण करीत जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परीसरात तलवारीसह फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना कळताच त्यांनी कारवाईच निर्देश दिले.


सहायक फौजदार अतुल वंजारी, हवालदार गणेश शिरसाळे, नाईक योगेश बारी, सुधीर सावळे, विकास सातदिवे, नितीन ठाकुर, मुकेश पाटील, नाना तायडे, किरण पाटील आदींनी सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या कब्जातून एक लोखंडी तलवारदेखील हस्तगत करण्यात आली. आरोपीविरोधात एमआयडीसी पोलिस स्टेशनला पाच आणि रामानंद नगर पोलिस स्टेशनला दोन असे गुन्हे दाखल आहेत. संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
