जळगावात दुकानाचा पत्रा कापून प्रवेश करीत 50 हजारांची रोकड लांबविली
Entering Jalgaon by cutting the letter of the shop and extending 50 thousand in cash
जळगाव : शहरात चोर्या, घरफोड्या सातत्याने सुरू असल्याने नागरीक व व्यावसायीकांमध्ये भीती पसरली आहे. शहरातील प्रताप नगरातील मनियार नामक होलसेल दुकान असून या दुकानाच्या छतावरील पत्रे कापत चोरट्यांनी प्रवेश केला व 50 हजारांची रोकड लांबवली. हा धक्कादायक प्रकार रविवार, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता उघडकीस आला. याप्रकरणी शनिवारी जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
छतावरून आले चोरटे
जळगाव शहरातील प्रताप नगरातील मनियार होलसेल दुकान आहे. नेहमीप्रमाणे शनिवार, 10 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता दुकान बंद करून सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर चोरट्यांनी होलसेल दुकानाचे पत्रे कापून आत प्रवेश केला. कॅश काऊंटरमधील 20 हजारांची रोकड तसेच एचडीएफसी बँक, कोटक, बंधन, देवनागरी व शिरपूर बँकेचे कोरे चेक व कपाटातील 30 हजारांची रोकड मिळून एकूण 50 हजारांची रोकड लांबवली. चोरीचा प्रकार रविवार, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. दुकान मॅनेजर चेतन विजय सुलक्षणे (31, अयोध्या नगर, जळगाव) यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार नोंदवली. तपास पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हवालदार पल्लवी मोरे करीत आहेत.


