तीन पॅसेंजरसह खान्देश एक्स्प्रेस रद्दने प्रवाशांचे हाल


उद्या भादली-जळगावदरम्यान तिसर्‍या लाइनसाठी चार तासांचा मेगाब्लॉक

भुसावळ : सोमवारी भुसावळहून सुटणार्‍या देवळाली शटल, सुरत पॅसेंजर, भुसावळ-बांद्रा खान्देश एक्स्प्रेस या गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्याने खान्देशातील प्रवाशांचे मोठे हाल झाले. विशेषतः सुरतसह नाशिक, मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांना अधिक मानसिक त्रास सोसावा लागला. प्रवाशांनी खाजगी लक्झरीसह एस.टी.बसने प्रवास केल्याने त्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागला.

उद्या चार तासांचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली ते जळगावदरम्यान असलेल्या तिसर्‍या लाइनसाठी स्टील गर्डर मंगळवारी सकाळी 9.10 ते दुपारी 1.10 या वेळेत टाकले जाणार असल्याने प्रशासनाने चार तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे अप-डाऊन मार्गावरील एकूण 12 गाड्या प्रभावीत होणार आहेत. विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर या गाड्या थांबवल्या जाणार आहेत. विशेषतः मंगळवारी अप-डाऊन करणार्‍या चाकरमान्यांना मेगाब्लॉकचा फटका बसणार असून त्यांना आता बसचा आधार घ्यावा लागणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !