जळगाव निवासी उपजिल्हाधिकार्यांवर हल्ला : दोघा आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी
Attack on Jalgaon Resident Sub-District Officer : Both accused sent to police custody
जळगाव : जळगाव निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्या संशयितांनी कासार यांच्या खिशातील एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधारकार्ड तसेच रोख पैसे काढून घेतले होते. याप्रकरणी गुन्ह्यात वाढीव कलम वाढवण्यात आले आहे. गुन्ह्यात वापरलेली लोखंडी टॉमी, कार पोलिसांनी जप्त केली असून अटकेतील संशयित गौतम पानपाटील, विठ्ठल पाटील यांना सोमवार, 12 रोजी न्यायालयाने दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.
दोघे संशयित पोलिस कोठडीत
गौतम पानपाटील तसेच विठ्ठल पाटील यांच्या कोठडीची मुदत सोमवार, 12 रोजी संपल्याने पोलिसांनी दोघांना न्या.एम.एम. बडे यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी वकील निखील कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला. त्यानुसार दोघांना पोलिस कोठडीत सुनावण्यात आली.


