नशिराबाद हद्दीतील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले
जळगाव : अल्पवयीन 14 वर्षीय मुलीला फुस लावून कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले. शनिवार, 10 रोजी रात्री 8 वाजेपूर्वी नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही घटना घडली.
या मुलीजवळ रेडमी कंपनीचा मोबाईल होता. त्यातील मोबाईल क्रमांक कुटुंबियांनी लावला असता लागला नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात पळवून नेल्यापप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तपास एएसआय रवींद्र तायडे करीत आहेत.


