जळगावातील महिलेची धूम स्टाईल पोत लांबवली
Jalgaon woman’s dhoom style texture extended जळगाव : धूम स्टाईल चोर्यांचे प्रमाणात वाढ झाल्याने महिलावर्ग धास्तावला आहे. जळगाव शहरातील साने गुरूजी कॉलनी परिसरात वैशाली जितेंद्र मुणोत (42) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 16 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता वैशाली मुणोत या महिला आपल्या मुलीसह सानेगुरूजी कॉलनीत शतपावली करण्यासाठी गेल्या असता धूम स्टाईल चोरट्यांनी त्यांची मंगलपोत लांबवली. रामानंद नगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही क्षणात चोरटे पसार
वैशाल मुणोत या मुलीसह शतपावली करीत असताना अचानक धूम स्टाईल आलेल्या भामट्यांनी वैशाली मुणोत यांच्या गळ्यातील 14 ग्रॅम वजनाची व 42 हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगलपोत ओढून नेली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने आरडाओरड केली तोपर्यंत दोघे भामटे पसार झाले. दुसर्या दिवशी शनिवार, 17 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर रामानंद नगर पोलिसात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.


