दारू विकत घेण्यावरून हॉटेल मॅनेजरला मारहाण ; 30 हजारांची रोकड लांबवली ः धरणगाव तालुक्यातील घटना


Hotel manager beaten up for buying liquor ; 30,000 cash extended: incident in Dharangaon taluka धरणगाव : धरणगाव तालुक्यातील पाळधी शिवारातील हॉटेल भाऊ येथे दारू विकत घेण्यावरून हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण करण्यात आली तर हॉटेलच्या गल्ल्यातील 30 हजार रुपयांची रोकड नेण्यात आल्याची घटना शनिवार, 17 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजता घडली. याप्रकरणी दुसर्‍या दिवशी रविवार, 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात आठ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण व लूट प्रकरण
धरणगाव तालुक्यातील पारधी शिवारातील रोडवर हॉटेल भाऊ येथे देविदास हेमराज ठाकूर (50) हे मॅनेजर आहेत. शनिवार, 17 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजता संशयित पद्माकर नन्नवरे, संजय नन्नवरे आणि त्यांच्यासोबत असलेले 5 ते 6 जण दारू पिण्यसाठी हॉटेलात आले. त्यांनी मॅनेजर ठाकरे यांना वाईन शॉपच्या रेटमध्ये दारू दे, अशी मागणी केली. त्यावर मॅनेजरने वाईन शॉप रेटमध्ये क्वार्टर दारू देण्यास मनाई केल्यानंतर एक क्वार्टर देण्यात आली मात्र नंतर संशयितांनी हॉटेलचे शटर बळजबरीने उघडून मॅनेजर यांना बेदम मारहाण करीत त्यांना जमिनीवर आपटले.



गल्ल्यातून लांबवली रोकड
संशयित पद्माकर नन्नवरे, संजय नन्नवरे आणि त्यांच्यासोबत असलेले 5 ते 6 जणांनी देविदास ठाकूर यांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच तू हॉटेलवर दिसला तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर ते बेशुद्ध झाले व शुद्ध आली तेव्हा गॅलक्सी हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. यावेळी हॉटेलच्या गल्ल्यात असलेली 30 हजार रुपयांची रोकड गल्ल्यात नसल्याचे मालकाचे लक्षात आल्यानंतर संशयितांनी ती रक्कम लुटून नेल्याचा संशय मॅनेजर यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !