मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांनी केले भुसावळ विभागाचे निरीक्षण
General Manager of Central Railway inspected the Bhusawal section भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के.यादव यांनी रविवारी भुसावळ विभागाचा दौरा केला. त्यांनी मनमाड येथील यार्ड, मनमाड-भुसावळ मार्गाची पहाणी केली, भुसावळात यार्डची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत डीआरएम ईति पांडे होत्या.
भुसावळात धावती भेट
महाव्यवस्थापक यादव यांनी रविवारी सकाळपासून मनमाड रेल्वे स्थानक, रेल्वे यार्ड, वर्कशॉपची पाहणी केली. यावेळी तेथील अधिकार्यांशी चर्चा करून कामाच्या दृष्टीने सूचना केल्यात. यावेळी मनमाड ते भुसावळ रेल्वे मार्गाचे निरीक्षण केले. यावेळी भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफतर्फे महाव्यवस्थापक यादव यांना सलामी देण्यात आली. यावेळी जीएम यादव यांनी यार्ड, वर्कशॉपची पाहणी केली. नंतर ताप्ती विश्रामगृहात अधिकार्यांसोबत चर्चा केली.


नाशिक ते बडनेरा या मार्गावर आता 130 ताशी वेगात रेल्वे गाड्या धावू लागल्या आहे. त्यामुळे वेळेची सुध्दा बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले. भुसावळ विभागात विकास कामांना चालना दिली जात आहे. अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत विकास साधला जाणार आहे, विकास कामांवर रेल्वे प्रशासनाचा अधिक भर आहे, असे महाव्यवस्थापक यादव यांनी सांगितले.
