चाळीसगाव एमआयडीसीतील भारत वायररोप कंपनीत चोरी : त्रिकूट जाळ्यात
Theft at Bharat Wirerope Company in Chalisgaon MIDC : Three in a trap चाळीसगाव : शहरातील एम.आय.डी.सी.तील भारत वायररोप कंपनीच्या बंद गोदामातून साहित्य चोरणार्या त्रिकूटाला चाळीसगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजय शिवाजी कुर्हाडे (20, आनंदवाडी, चाळीसगाव, ह.मु.कृष्णापुरी, पाचोरा), सोमनाथ महादू गायकवाड (34, कृष्णापुरी, पाचोरा) व सागर बापू जाधव (20, जुवार्डी, ता.भडगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
चोरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
प्रिन्सकुमार श्रीराम नरेश गुप्ता (सेक्टर नं.04, एमआयडीसी, चाळीसगाव) यांनी चाळीसगाव शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, भारत वायररोप कंपनीच्या बंद गोदामातून चोरट्यांनी 45 हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रीक वायरचे पाच बंडल तसेच 750 रुपये किंमतीचे पीपीकोर वायरचे एक बंडल चोरट्यांनी लांबवले. शह पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून 45 हजार 750 रुपयांचा चोरलेला मुद्देमाल जप्त केला.


यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश बेलदार, राहुल सोनवणे, भूषण पाटील, दीपक पाटील, निलेश पाटील, अमोल भोसले, आशितोष सोनवणे, रवींद्र बच्छे आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
