सरकारी नोकरी लावण्याच्या बहाण्याने चाळीसगावच्या युवकाला तीन लाखांचा गंडा
A youth of Chalisgaon was extorted three lakhs on the pretext of getting a government job
चाळीसगाव : सरकारी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने चाळीसगावस्थित युवकाला तीन लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी दोघांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
शामकांत युवराज भोसले (27, आमडदे, ता.भडगाव, ह.मु.चाळीसगाव) या युवकाच्या तक्रारीनुसार, 7 जुलै 2022 रोजी रात्री चाळीसगाव शहरातील स्टेशन रोडवरील एका पानटपरीवर संशयितांशी ओळख झाल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले व त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणाने बँक खात्याद्वारे पाच लाख रुपये संशयितांना दिले मात्र नोकरी न लागल्याने सतत तगादा लावल्यानंतर संशयितांनी दोन लाख रुपये परत केले मात्र उर्वरीत तीन लाख रुपये परत न केल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तरुणाने चाळीसगाव शहर पोलिसात तक्रार नोंदवली. याप्रकरणी संशयित संजय कामतप्रसाद राजपूत (मुंबई नाका, नाशिक) व सुशील भालचंद्र पाटील (पंचवटी नाशिक) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले करीत आहेत.


