जळगावात भिशीच्या नावाखाली दाम्पत्याने 13 महिलांना लावला 55 लाखांचा चुना


In Jalgaon, a couple cheated 13 women in the name of Bhishi worth 55 lakhs जळगाव : जळगावात भिशीनिमित्त पैसे गोळा करीत 13 महिलांची तब्बल 55 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आल्याने खळब्ळ उडाली आहे. जळगावच्या कोल्हे हिल्स परिसरातील योजना नगरातील एका दांपत्याने 13 महिलांची तब्बल 55 लाख 22 हजार 280 रुपयांत फसवणूक केली. पैशांचा तगादा लावूनही पैसे न मिळाल्याने अखेरएका महिलेने तालुका पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यानंतर संजय सोळंखे व तिचा पती संजय धोंडू सोळंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

13 महिलांना लावला चुना
पल्लवी विजय ठोसर या योजनानगरात वास्तव्यास आहेत. दीड वर्षापूर्वी त्यांच्याच भागातील सविता व तिचा पती संजय सोळंखे यांच्याशी ओळख झाली. सप्टेंबर महिन्यात त्यांनी पैसे वाढवून देण्याचे आमिष दाखवून ठोसर यांच्याकडून 50 हजार रुपये घेतले. नंतर हळूहळू काही रक्कम देऊन ठोसर यांचा विश्वास संपादन केला. योजनानगरातील महिलांकडून दर महिन्याला खासगी भिशीच्या नावाने सविता ही महिलांकडून रक्कम गोळा करतअसल्याची माहितीही ठोसर यांनामिळाली होती. नंतर सविता हिने काही महिलांच्या नावावर वैयक्तिक कर्जही काढत ही रक्कम ठेवून घेतली.



दोघांविरोधात अखेर गुन्हा दाखल
सविता व तिच्या पतीने ठोसर यांच्याकडून जादा पैसे परत करण्याचे आमिष दाखवून 13 लाख 46 हजार 200 रुपये घेतले. याशिवाय काही महिलांकडून 41 लाख 76 हजार 80 रुपये एवढी रक्कम घेतली. दरम्यान, ठोसर यांनी सविता हिला पैसे परत करण्यास सांगितले मात्र तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर ठोसर यांनी महिलेच्या घरी चकरा मारल्या परंतु ती मिळून आली नाही. अखेर आपली व इतर महिलांची फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यावर ठोसर यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सविता सोळंखे व तिचा पती संजय सोळंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !