चोपडा ग्रामीण पोलिसांकडून दोन लाख 28 हजारांचा गुटखा जप्त


Gutkha worth two lakh 28 thousand seized by Chopra rural police चोपडा : चोपडा ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बोलेरो पिकअप वाहनातून दोन लाख 28 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधी सुपारी जप्त करीत आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई बुधवार, 21 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. या कारवाईने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
चोपडा ग्रामीण पोलिसांना सेंधवाकडून धुळ्याकडे जाणार्‍या चोपडा-शिरपूर रस्त्यावर हातेड फाटा येथे किराणा माल वाहून नेणार्‍या वाहनातून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बुधवारी सापळा रचला. पांढर्‍या रंगाची बोलेरो पिकअप (एम.एच.03 सी.पी.2497) आल्यानंतर तिची पंचांसमक्ष झडती घेतल्यानंतर त्यात एक लाख 94 हजार 480 रुपये किंमतीचा विमल पानमसाला व 34 हजार 320 रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू आढळली तर साडेचार लाख रुपये किंमतीचे वाहन मिळून सहा लाख 78 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्या फिर्यादीवरून प्रशांत मानकू भील (28, हेंकयवाडी, ता.धुळे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !