जळगावात बँकेने जप्त केलेल्या घरात चोरट्यांचा धुडगूस
Thieves’ rampage in the house confiscated by the bank in Jalgaon जळगाव : आयडीबीआय बँकेने जप्ती केलेल्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. लोखंडी कपाटातील सामानाची फेकाफेक करत मुद्देमालाचा शोध घेत चोरी करण्याचा प्रयत्न केला. जुना खेडी शिवारात बैठक हॉलजवळ हा प्रकार मंगळवार, 20 ते बुधवार, 21 रोजीच्या सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडला.
रीकाम्या हाताने चोरटे परतले
जुना खेडी शिवारात सर्व्हे नं.132/2 ए मध्ये प्लॉट नं. 13 या घरासाठी आयडीबीआय बँकेने गृह कर्ज दिले. घराचे हप्ते थकल्याने आयडीबीआय बँकेने सरफेसी कायद्यान्वये 13 फेब्रुवारीला हे घर जप्त केले. बँकेने लॉक करत हे घर ताब्यात घेतले. चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडा तोडत करत घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सामान अस्तव्यस्त करत चोरी करण्याचा प्रयत्न केला. मुद्देमाल हाती न लागल्याने चोरटे निराश होवून खाली हाताने परतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बँकेचे वसुली अधिकारी राजेश जयस्वाल (35, रा.जळगाव) यांनी तक्रार दिली.


पोलीस अधिकार्यांची धाव
शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.टी.धारबडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे करीत आहेत.
