भुसावळात बागवान बिरादरीच्या 300 युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश


300 youths of Bagwan fraternity joined NCP in Bhusawal भुसावळ : शहरातील बागवान हॉलमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भव्य सत्कार समारंभ व पक्ष प्रवेश सोहळ्यात बागवान बिरादरीच्या 300 पेक्षा जास्त युवकांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष त्र्यंबक चौधरी (दाढी), युवक शहराध्यक्ष वसीम शेख, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नदीम बागवान, आसीफ खान इकबाल खान, शहर उपाध्यक्ष बशीर शेख, आसीफ भाई उर्फ मक्का भाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.



बहुजन समाजाचा विकास हेच ध्येय
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे म्हणाले की, अजित पवार यांच्या विषयी विरोधक गैरप्रचार करीत आहे. ते म्हणतात की, हिंदुत्ववादी भाजपाशी अजित पवार यांनी हात मिळवणी केली मात्र सत्तेमध्ये जाताना अजित पवार यांनी बहुजन समाज, अल्पसंख्यांक समाजाचा विकास व्हायला पाहिजे हे धोरण ठेवूनच भाजपात प्रवेश केला. सूत्रसंचालन हारुण उस्माणी तर आभार मोहम्मद जाकीर बागवान यांनी मानले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !