भुसावळ शहरात उद्यापासून दोन दिवस राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धा
State level boxing tournament for two days from tomorrow in Bhusawal city भुसावळ : छत्रपती शिवाजी महाराज, संत रोहिदास महाराज व संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून रेल्वे नॉर्थ कॉलनी ग्राउंड, संत गाडगेबाबा शाळेमागे 24 व 25 रोजी राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मान्यवरांची उपस्थिती
उद्घाटक ऑल इंडिया एस.सी.एस.टी.असोसिएशनचे मंडल सुधीर जंजाळे तर अध्यक्षस्थानी शहरचे निरीक्षक संदीप रणदिवे आहेत. एनआरएमयूचे मंडल सचिव इसरार खान यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. बक्षीस वितरण भीम आर्मीचे गणेश सपकाळे व सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष बबलू नेतकर यांच्या उपस्थितीत होईल. स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता बाळा सोनवणे असून उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.








