नाशिक परीक्षेत्रातील 14 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या : जळगावातील तीन अधिकार्यांचा समावेश
Transfers of 14 Police Inspectors in Nashik Examination Hall : Including three officers from Jalgaon भुसावळ : एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण करणार्या नाशिक परीक्षेत्रातील 14 पोलीस निरीक्षकांच्या नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बदल्या केल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बदल्या करण्यात आल्या असून निवडणूक आयोगाने या संदर्भात निर्देश दिले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
जळगावातील तीन अधिकार्यांच्या बदल्या
जळगाव गुन्हे शाखेचे जयपाल हिरे, चाळीसगाव ग्रामीण पोलीास ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांची धुळे येथे तर जळगाव सायबर सेलच्या शिल्पा पाटील यांची नाशिक ग्रामीणमध्ये बदली करण्यात आली आहे.


अन्य 11 अधिकार्यांच्या बदल्या अशा
अहमदनगर येथील ज्योती गडकरी व विजय करे यांची नाशिक ग्रामीण, नाशिक ग्रामीणचे विजय कुटे यांची जळगाव, नाशिक ग्रामीणचे रवींद्र मगर यांची अहमदनगर, नंदुरबारचे दीपक बुधवंत यांची जळगाव, नंदुरबारचे भरत जाधव यांची अहमदनगर, नाशिक ग्रामीणचे अशोक पवार यांची जळगाव, नाशिक ग्रामीणचे बापूसाहेब जाधव व शाम निकम यांची नंदुरबार, नाशिक ग्रामीणचे पांडुरंग पवार यांची जळगाव तर नंदुरबारचे अजय वसावे यांची नाशिक ग्रामीणला बदली करण्यात आली.
