जळगावात तरुणाकडून तीन पिस्टलासह चार काडतूस जप्त : गुन्हे शाखेची कामगिरी


जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे तीन पिस्टल व चार काडतूस बाळगणार्‍या तरुणाला अटक केली आहे. किशोर रामदास कोळी (30, रा.कांचन नगर जळगाव) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहराच्या गणेश कॉलनी रोड परीसरातील बजरंग बोगद्याजवळ संशयितगावठी कट्ट्यासह येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने किशोर कोळी यास अटक केली. त्याच्याकडून एक लाख 31 हजार रुपये किंमतीचा तीन कट्टे व चार काडतूस व दुचाकी जप्त करण्यात आली.



यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमोल मारे, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, उपनिरीक्षक गणेश चौबे, विजयसिंग पाटील, सचिन महाजन, अक्रम शेख, महेश महाजन, किरण चोधरी, सुधाकर अंभोरे, प्रीतम पाटील, ईश्वर पाटील, प्रियंका कोळी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !