गुटखा तस्कर हादरले : जळगावात गोदामातून 14 लाखांचा गुटखा जप्त
Gutkha smugglers shaken: Gutkha worth 14 lakhs seized from a godown in Jalgaon जळगाव : राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटखा-तंबाखूचा साठा जळगावातील एमआयडीसी भागातील गोदामात साठवून ठेवला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला कळताच या विभागाने स्थानिक एमआयडीसी पोलिसाची मदत घेत छापा टाकून 14 लाख रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित पानमसाला, तंबाखूचा साठा जप्त केला. याप्रकरणी शनिवारी एका तरुणावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील एम-सेक्टर मधील एका गोदामात बेकायदेशीररीत्या शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला व तंबाखू साठवून ठेवला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळताच पथकाने शुक्रवार, 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने छापा टाकला.


सुमारे 14 लाख रुपयांचा सुगंधित पानमसाला व तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिरालाल उत्तम पाटील (38, रा. पिंप्राळा, जळगाव ) या तरुणा विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.