बैलगाडीच्या चाकात शाल अडकून गळफास बसताच महिलेचा मृत्यू : भादलीतील शोककळा
Woman’s death after hanging her shawl in the wheel of a bullock cart : Mourning in Bhadli जळगाव : अंगावरील शालीचा भाग बैलगाडीच्या चाकात अडकताच शाल ओढली जावून गळ्याला फास बसल्याने महिलेचा मृत्यू ओढवला. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली, याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जानुबाई भायला बारेला (वय 32, रा. गोंट्या पांचाळ, ता.भगवानपुरा, जि.खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु. ादली, ता.जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.
गळ्याला फास बसताच महिलेचा मृत्यू
जानुबाई भायला बारेला या भादली येथे पती, मुले, दीर, जाऊ यांच्यासह वास्तव्याला होत्या. शेतामध्ये मजुरी काम करून त्या परीवाराचा उदरनिर्वाह करीत होत्या. शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्या भादलीच्या शेतशिवारात बैलगाडीने त्यांच्या परिवारासह कामाला जात असताना त्यांच्या अंगावरील शालीचा काही भाग हा बैलगाडीच्या चाकात आला. बैलगाडीच्या वेगाने त्यांच्या मानेला जोरात गळफास बसल्याने जबर जखम झाली. त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तत्काळ गाडी थांबवून त्यांना पाणी पाजले मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.



