किनगाव ग्रामीण रुग्णालयाचे ऑनलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन
यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले व रुग्णालयाचे लोकार्पण झाले. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुणालयात झाले असून मोठ्या उत्साहात या ठिकाणी या ऑनलाईन शुभारंभाची प्रक्रिया पार पडली. सायंकाळी 4.45 मिनिटांनी लोकार्पण झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमात जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, जिल्हा परीषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजू तडवी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.दर्शना निकम, बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, बाजार समितीचे संचालक सूर्यभान पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरींसह प्राथमिक आरोग्य केंद्र किनगावचा संपूर्ण स्टॉप, अभियंता शिंदे आदींची उपस्थिती होती.








