चाळीसगाव पोलिसांना वॉण्टेड आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Chalisgaon Police Wanted Accused in Local Crime Branch जळगाव : चाळीसगाव पोलिसांना तीन वर्षांपासून हव्या असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल आहेत. जगदीश बाळू शेळके (23, रा.पथराड, ता. भडगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. संशयिताला चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला माहिती रविवारी चाळीसगाव शहर पोलिसांना चोरीच्या प्रकरणात हवा असलेला संशयित आरोपी हा पथराड गावी येणार असल्याची गोपनिय माहिती प्राप्त होताच पथकाने संशयिताला पथराड येथून ताब्यात घेतले. अधिक कायदेशीर कारवाईसाठी त्यास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.



यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश चौभे, विजयसिग पाटील, लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, किरण चोधरी, सुधाकर अंभोरे, राहुल पाटील आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !