भुसावळातील नितीन धांडे यांचा भाजपात प्रवेश
राष्ट्रवादीला धक्का : मुंबई कार्यालयात प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश
Nitin Dhande from Bhusawal joins BJP भुसावळ : भुसावळ राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व अष्टभूजा डेअरीचे संचालक नितीन धांडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मंगळवारी मुंबईत कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश घेतला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. नितीन धांडे यांच्या भाजपा प्रवेशाने आगामी काळातील नगरपालिका निवडणुकांमध्ये प्रभागातील स्थानिक राजकारणातही मोठे बदल घडणार आहेत.
चर्चांना पूर्णविराम : धांडे अखेर भाजपात
अष्टभूजा डेअरीचे संचालक असलेले नितीन धांडे यांचा सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून नितीन धांडे हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होती व सोमवारी निवडक कार्यकर्त्यांसह स्थानिक पदाधिकार्यांसोबत धांडे हे मुंबईकडे निघाले. मंगळवारी सकाळी भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला.



यांची पक्ष प्रवेशप्रसंगी उपस्थिती
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, उद्योजक मनोज बियाणी, भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी, अॅड.बोधराज चौधरी, महेंद्रसिंग ठाकूर, अजय नागराणी, निक्की बत्रा, देवा वाणी, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, अतुल झांबरे, विशाल शहा, आशिष पटेल, जितू माखीजा, प्रदीप वराडे (सर), ललित भंगाळे, निलेश कोळी, भूषण भंगाळे, नारायण तांबट, सुमित साळुंके, वृषभ धांडे, विपूल बर्हाटे, हर्षल वारके, वरणगावचे माजी नगरसेवक नितीन माळी आदींची उपस्थिती होती.
पंतप्रधानांच्या नेतृत्वाने प्रभावीत
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार भावले असून स्थानिक आमदार संजय सावकारे, भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भाजपात प्रवेश केला आहे. विरोधात असल्याने प्रभागाचा विकास खुंटला होता मात्र आता निश्चितच प्रभागाचादेखील विकास होईल, असा आशावाद धांडे यांनी वर्तवला.





