15 हजारांची लाच भोवली : जळगावातील लाचखोर विद्युत निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
15,000 bribe: A bribe-taking electricity inspector in Jalgaon is in the net of ACB जळगाव : शासकीय कंत्राटदाराचे लायसन्स नूतनीकरणासाठी 15 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव उद्योग, उर्जा व कामगार विभाग गणेश नागो सुरळकर (52, पार्वती नगर, जळगाव) यांना जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी कार्यालयातच उशिरा अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
जळगावातील 32 वर्षीय तक्रारदार हे कंत्राटदार असून ते शासनाची इलेक्ट्रिकल कामे करतात व त्यांच्याकडे त्यासाठी लायसन्स आहे. या लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांनी आरोपी सुरळकर यांच्याकडे अर्ज केला होता. लायसन्स नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे मंगळवारी 15 हजारांची लाच मागणी करण्यात आल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व पडताळणीनंतर पंचांसमक्ष लाच स्वीकारताच सुरळकर यांना मंगळवारी सात वाजेच्या सुमारास कार्यालयात अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे व पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी केला.