चाळीसगाव शहर पोलिसांना वॉण्टेड आरोपी जळगाव एलसीबीच्या जाळ्यात


Chalisgaon city police wanted accused in Jalgaon LCB net जळगाव : चोरीच्या गुन्ह्यात चाळीसगाव पोलिसांना हव्या असलेल्या संशयिताला जळगाव गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. तीन वर्षांपासून आरोपी पोलिसांना चकवा देत होता मात्र गोपनीय माहितीनंतर त्यास अटक करण्यात आली. धीरज अरुण कानडे (36, रा.आडगाव, ता.एरंडोल) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्यास अधिक कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आकाशवाणी चौकातून केली अटक
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तीन वर्षांपूर्वी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी धीरज अरुण कानडे हा पोलिसांना गवसत नव्हता मात्र धीरज कानडे हा जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवार, 25 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता पथकाने आकाशवाणी चौकात सापळा रचून धीरज कानडेला पकडले. संशयित आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !