भरधाव दुचाकीची धडक ; जळगावात पादचार्याचा मृत्यू ; दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
Hit by a speeding bike ; Pedestrian dies in Jalgaon ; Offense against biker जळगाव : रस्त्याने घरी पायी चालत जात असताना भरधाव दुचाकीने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. औरंगाबाद रोडवरील अहिंसा तिर्थ गो शाळेच्याजवळ 15 रोजी हा अपघात घडला. करतार तोताराम पवार (वय 50, रा.मांडवेदिगर, ह.मु.मकरा एजन्सी, विमानतळासमोर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ई.डी.7151) वरील चालकाविरुध्द सोमवार, 26 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास सहायक पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे करीत आहेत.

