भुसावळातील हिंदी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिवस


भुसावळ : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 27 फेब्रुवारी हा दिवस कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून तसेच मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रमेश जोशी होते. त्यांनी विद्यार्थी मित्रांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून देताना अनेक उदाहरणे दिली तसेच संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, कवयित्री बहिणाबाई यांच्या गाण्यांचा ही त्यांनी उल्लेख केला.

प्रा.ज्योती ओस्तवाल यांनी आपल्या वक्तव्यात मराठी भाषेचा थोर वारसा कसा समृद्ध आहे आणि लेखक कथाकार नाटककार या मराठी मातीने घडविले आहे याबाबत माहिती देत मराठी भाषेचे साहित्य प्रत्येकाने वाचलेच पाहिजे, जेणेकरून आपले मराठी भाषेविषयी प्रेम वृद्धिंगत होईल, असे सांगितले. प्रा.अनुपम शर्मा यांनी मराठी भाषेची प्रतिज्ञा विद्यार्थी वर्गाला तसेच सर्वांना दिली. सूत्रसंचालन डॉ.पुनम त्रिवेदी तर आभार प्रा.अनुपम शर्मा यांनी मानले. डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, डॉ.पूनम त्रिवेदी, प्रा.ज्योती ओस्तवाल, प्रा.अनुपम शर्मा, प्रा.शिबा खान, प्रा.समता तायडे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !