रावेर तालुक्यातील सात ग्रामपंचायतीवर येणार ‘महिलाराज’
‘Mahilaraj’ will come to seven Gram Panchayats in Raver Taluka रावेर : रावेर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच पदाच्या अनुसूचित क्षेत्रातील एक द्वितियांश आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. 13 ग्रामपंचायतीपैकी सात ग्रामपंचायतीत महिला सरपंच असतील.
रावेरात आरक्षण सोडत
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अपर जिल्हाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी देवयानी यादव यांच्या उपस्थितीत रावेर तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील 13 ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच पदापैकी एक द्वितियांश सरपंच पदे पूर्णतः महिलांसाठी आरक्षीत करण्यासाठी बुधवारी आरक्षण सोडत रावेर तहसील कार्यालयात काढण्यात आली. दरम्यान, आरक्षण सोडतीनंतर लवकरच जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणार असल्याने इच्छुकांमध्ये निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.



या ग्रामपंचायतीत महिलांना मिळणार संधी
परावेर तालुक्यातील 13 आदिवासी अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या नावाने चिठ्या तयार करून रेहान तडवी (9) या मुलाच्या हातून वरील 13 पैकी सात चिठ्या काढण्यात आल्या. यात जुनोने-मंगरूळ ग्रुप, अभोडे बु.॥ ग्रुप, सहस्त्रलिंग गु्रप, कुसुंबे बु.॥, कुसुंबे खुर्द, निमड्या, जीन्सी ग्रुप या सात ग्रामपंचायतीचे महिला सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. तहसीलदार बी.ए.कापसे, गटविवास अधिकारी दीपाली कोतवाल, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी आरक्षण काढण्यासाठी सहकार्य केले.





