जळगावात घरफोडीपूर्वीच दोघे संशयित एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
Two suspects in the net of MIDC police even before the burglary in Jalgaon जळगाव : चोरी, घरफोडी करण्याच्या उद्देशाने मध्यरात्री फिरणार्या दोघत्तंना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजता हॉटेल कस्तूरी आणि मेहरूण परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.
गस्त करताना आढळले संशयित
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी रात्री गस्तीवर असतांना रात्री 11.30 वाजेच्या सुमारास हॉटेल कस्तुरीजवळ महेश संतोष भोई (20, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) हा चोरी करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळला तर मेहरुण स्मशानभूमीजवळ राजेश माणिकराव राठोड (23, तांबापुरा, जळगाव) हा चोरी, घरफोडीच्या उद्देशाने चेहरा झाकून संशयास्पदरित्या फिरताना आढळल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, सचिन पाटील, विकास सातदिवे, सुधीर साळवे, गणेश शिरसाळे, ललित नारखेडे, आकाश राजपूत, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली.


