वरणगावातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नितीन माळी यांचा भाजपात प्रवेश !
मुंबई पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत केला प्रवेश
Former corporator of NCP in Warangaon Nitin Mali joins BJP! भुसावळ : वरणगावातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व माजी नगरसेवक नितीन (बबलू) माळी यांनी नुकताच मुंबई भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाल्यानंतर माळी यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. माळी यांच्या प्रवेशानंतर आगामी काळात वरणगावातील निवडणुकांमध्ये समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे.
यांची पक्ष प्रवेशप्रसंगी उपस्थिती
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, उद्योजक मनोज बियाणी, भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी, अॅड.बोधराज चौधरी, महेंद्रसिंग ठाकूर, अजय नागराणी, निक्की बत्रा, देवा वाणी, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, अतुल झांबरे, विशाल शहा, आशिष पटेल, जितू माखीजा, प्रदीप वराडे (सर), ललित भंगाळे, निलेश कोळी, भूषण भंगाळे, नारायण तांबट, सुमित साळुंके, वृषभ धांडे, विपूल बर्हाटे, हर्षल वारके आदी उपस्थित होते.








