शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने पाचोर्‍यातील नोकरदाराला पावणेबारा लाखांचा गंडा


पाचोरा : शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवल्यास जादा रक्कम मिळेल, असे आमिष दाखवून पाचोर्‍यातील 38 वर्षीय नोकरदार तरुणाला तब्बल पावणेबारा लाखांचा गंडा घालण्यात आला. 21 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2024 दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी विशाल प्रकाश इंगळे (38, पाचोरा) यांच्या फिर्यादीवरून इन्स्टाग्रामवर मेसेज करणार्‍या संशयिताविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
पाचोरा शहरातील विशाल प्रकाश इंगळे यांच्या मोबाईल क्रमांकावर दोन वेगवेगळ्या व्हाट्सअप क्रमांकावरून संशयितांनी मेसेज करीत संपर्क साधला व विविध कंपन्यांचे नाव सांगत या कंपनीचे शेअर खरेदी केल्यास अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवले. एका अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर इंगळे यांच्या खात्यात वाढीव रक्कम दाखवून विशाल यांचा विश्वास संपादन करीत 11 लाख 75 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. तपास प्रभारी निरीक्षक किसनराव नजन पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !