रावेर लोकसभेसाठी आमदार एकनाथराव खडसे तर जळगावातून ठाकरे गटाच्या हर्षल मानेंना उमेदवारीचे संकेत !

लोकसभेसाठी मविआची संभाव्य उमेदवारांची यादी समोर ; भाजपामध्ये मात्र प्रचंड रस्सीखेच


MLA Eknathrao Khadse for Raver Lok Sabha and Harshal Mane of Thackeray group from Jalgaon. जळगाव : मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असून या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर लोकसभेसाठी नेमके कोण उमेदवार असणार ? याबाबत सर्वच पक्षांमध्ये उत्सुकता लागली आहे. महाविकास आघाडीकडून मात्र रावेरसाठी आमदार एकनाथराव खडसे तर जळगावातून शिवसेना ठाकरे गटाचे डॉ.हर्षल माने यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात ‘एबीपी माझा’ने या वृत्तवाहिनीने दिले आहे.

असे आहेत महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार
रामटेक – रश्मी बर्वे, कुणाल राऊत, किशोर गजभिये, तक्षशिला वागधरे काँग्रेस
बुलढाणा- नरेंद्र खेडेकर शिवसेना ठाकरे गट
यवतमाळ वाशीम- संजय देशमुख शिवसेना ठाकरे गट
हिंगोली- सचिन नाईक काँग्रेस
परभणी- संजय जाधव शिवसेना ठाकरे गट
जालना- शिवाजीराव चोथे शिवसेना ठाकरे गट
संभाजीनगर- चंद्रकांत खैरे शिवसेना ठाकरे गट
नाशिक- विजय करंजकर शिवसेना ठाकरे गट
पालघर- भारती कामडी शिवसेना ठाकरे गट
कल्याण- सुष्मा अंधारे किंवा आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गट
ठाणे- राजन विचारे शिवसेना ठाकरे गट
मुंबई उत्तर पश्चिम- अमोल कीर्तीकर शिवसेना ठाकरे गट
मुंबई दक्षिण- अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गट
मुंबई ईशान्य- संजय दिना पाटील शिवसेना ठाकरे गट
मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई शिवसेना ठाकरे
रायगड- अनंत गीते शिवसेना ठाकरे गट
रत्नागिरी सिंधुदुर्ग- विनायक राऊत शिवसना ठाकरे गट
मावळ- संजोग वाघेरे शिवसेना ठाकरे गट
शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना ठाकरे गट
धाराशिव- ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गट
कोल्हापूर- शिवसेना ठाकरे गट ( शिवसेना ठाकरे गटाकडे ही जागा जरी असली तरी ही जागा छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली जाऊ शकते )
हातकणंगले- (स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी जागा सोडली मात्र अद्याप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मग यामध्ये येण्याची तयारी न दर्शवल्याने ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे आहे )
अकोला- प्रकाश आंबडेकर वंचित बहुजन
शिरूर- अमोल कोल्हे, राष्ट्रवादी
सातारा- श्रीनिवास पाटील राष्ट्रवादी (मात्र श्रीनिवास पाटील यांच्या नुसार त्यांच्या मुलाला उमेदवारी द्यावी- सारंग पाटील)
माढा- लक्ष्मण हाके (संध्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आहे मात्र राष्ट्रवादी चिन्हावर लढणार)
बारामती- सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी
जळगाव- हर्षल माने शिवसेना (राष्ट्रवादी उमेदवार असेल असं वेदांतच म्हणणं आहे)
रावेर- एकनाथ खडसे, राष्ट्रवादी
दिंडोरी- चिंतामण गावीत, राष्ट्रवादी
बीड- नरेंद्र काळे राष्ट्रवादी
अहमदनगर- निलेश लंके, राष्ट्रवादी
अमरावती- बळवंत वानखेडे आणि राहुल गडपाले काँग्रेस
भंडारा- नाना पटोले, काँग्रेस
चंद्रपूर- प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेस
गडचिरोली- डॉ. नामदेव उसेंडी, डॉ.नामदेव किरसान आणि डॉ.नितीन कोडवते, काँग्रेस
नांदेड- आशा शिंदे, काँग्रेस
लातूर- अजून नाव ठारलं नाही, काँग्रेस
धुळे- तुषार शेवाळे आणि शामकांत सनेर, काँग्रेस
नंदुरबार- के.सी.पाडवी, काँग्रेस
पुणे- रवींद्र धनगेकर, काँग्रेस
सोलापूर- प्रणिती शिंदे, काँग्रेस
सांगली- विशाल पाटील, काँग्रेस
मुंबई उत्तर मध्य- काँग्रेस (अजून ठरलं नाही)
मुंबई उत्तर- काँग्रेस (अजून ठरलं नाही)
भिवंडी- दयानंद चोरघे, काँग्रेस
वर्धा- हर्षवर्धन देशमुख आणि समीर देशमुख, काँग्रेस
नागपूर- अभिजीत वंजारी, विशाल मुत्तेमवार, प्रफुल गुडधे, काँग्रेस



रावेर लोकसभेसाठी भाजपामध्ये रस्सीखेच
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्या तिकीटाबाबत अद्यापही संभ्रम कायम असून पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात ? याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा संधी न मिळाल्यास त्यांच्या जागी पक्षात नव्याने आलेल्या डॉ.केतकी पाटील किंवा माजी खासदार स्व.हरिभाऊ जावळे यांचे सुपूत्र अमोल जावळे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

जिल्ह्यात जळगाव व रावेर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे राखण्यात भाजपला यश आले आहे. या मतदार संघात चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर हे विधानसभा मतदार संघ येतात. यातील रावेर व मलकापूर मतदार संघात काँग्रेसचे आमदार आहेत तर जामनेर व भुसावळ विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात अपक्ष आमदार आहेत मात्र आ.चंद्रकांत पाटील हे शिंदे गटात आल्याने ते भाजप युतीकडेच आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !