गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूसांसह जळगावातील तरुण एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
Young MIDC police in Jalgaon with Gavathi pistol and two live cartridges जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस बाळगणार्या गुन्हेगाराला अटक केली आहे. ही कारवाई बुधवार, 28 रोजी जळगाव शहरातील अंजिठा चौफूली परिसरात भुसावळ रोडवरील बस स्टॅण्डजवळ करण्यात आली. अर्षद शेख हमीद उर्फ अन्न (24, रा.गेंदालाल मिल, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना संशयिताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कावाईचे निर्देश दिले. पथकाने अर्षद यास ताब्यात घेतल्यानंतर अंगझडतीत त्याच्याकडील 35 हजार रुपये किंमतीचा गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. सुधीर साळवे यांच्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताला न्यायमूर्ती व्ही. एम. देशमुख यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे अॅडव्होकेट स्वाती निकम यांनी बाजू मांडली.


यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, एएसआय अतुल वंजारी, किरण पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील, किशोर पाटील, ललीत नारखेडे, राहुल रगडे, नितीन ठाकूर आदींच्या पथकाने केली. दरम्यान, अर्षद हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.