भुसावळात कुस्ती आखाड्यात सोलापूरचा सिकंदर शेख ठरला विजेता


Sikandar Sheikh of Solapur became the winner in Bhusawal wrestling arena भुसावळ  : शहरातील स्व.आशिक पहेलवान यांच्या स्मरणार्थ खडका रोडवरील एसी गोदामाच्या जवळ असलेल्या लालमाती मैदानावर कुस्त्यांची दंगल आयोजीत करण्यात आली. सोलापूरचा सिकंदर शेख व मथूरेचा भारत केसरी उमेश यांच्यात जोरदार अंतीम लढत झाली. या लढतीत उमेश हा जखमी झाल्याने त्याने कुस्ती न खेळण्याचा निर्णय घेतल्याने सोलापूर येथील सिकंदर पहेलवानास विजयी घोषीत करण्यात आले.

यांनी केले होते आयोजन
खडकारोडवर झालेल्या कुस्तीची दंगल ही इकबाल पहेलवान, रईस पहेलवान, जाकीर पेंटर, जमील पहेलवान व संतोष बारसे यांनी आयोजीत केली होती. यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरीदेखील उपस्थित होते.



30 मिनिटांची झाली लढत
अंतीम कुस्ती ही 30 मिनिटापर्यंत चालली. यात उमेश पहेलवान जखमी झाल्याने ही कुस्ती थांबली. 30 मिनिटे वेगवेगळे डावपेच मारल्यानंतर सिकंदर शेख हा विजयी ठरला. राज्यभरातील कुस्ती प्रेमी शौकीनांची यावेळी उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !