भुसावळात कुस्ती आखाड्यात सोलापूरचा सिकंदर शेख ठरला विजेता
Sikandar Sheikh of Solapur became the winner in Bhusawal wrestling arena भुसावळ : शहरातील स्व.आशिक पहेलवान यांच्या स्मरणार्थ खडका रोडवरील एसी गोदामाच्या जवळ असलेल्या लालमाती मैदानावर कुस्त्यांची दंगल आयोजीत करण्यात आली. सोलापूरचा सिकंदर शेख व मथूरेचा भारत केसरी उमेश यांच्यात जोरदार अंतीम लढत झाली. या लढतीत उमेश हा जखमी झाल्याने त्याने कुस्ती न खेळण्याचा निर्णय घेतल्याने सोलापूर येथील सिकंदर पहेलवानास विजयी घोषीत करण्यात आले.
यांनी केले होते आयोजन
खडकारोडवर झालेल्या कुस्तीची दंगल ही इकबाल पहेलवान, रईस पहेलवान, जाकीर पेंटर, जमील पहेलवान व संतोष बारसे यांनी आयोजीत केली होती. यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरीदेखील उपस्थित होते.





