भुसावळात उद्या बिसारा लेडीज इक्वॅलिटी रन
Bisara Ladies Equality Run tomorrow in Bhusawal भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशन आयोजित बिसारा लेडीज इक्वॅलिटी रनचे शहरातील कोरोनेशन क्लबच्या मैदानावर रविवारख 3 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन किमी, पाच किमी व 10 किमी अशा तीन श्रेणीत होत आहे. या स्पर्धेसाठी तीन किमीमध्ये 280, पाच किमीमध्ये 153 तर 10 किमीमध्ये 42 महिला धावणार आहेत. रविवारी पहाटे सहा वाजता स्पर्धेस सुरुवात होईल. याचबरोबर आयोजकांतर्फे प्रत्येक महिला सहभागी स्पर्धकास टी-शर्ट, विशिष्ट असा बीब क्रमांक, धावणे पूर्ण केल्यानंतर मेडल व गुडी बॅग शनिवार, 2 मार्च रोजी शहरातील सहकार नगरातील आयएमए हॉलमध्ये सकाळी 11 ते दुपारी चार वाजेपर्यंत वितरीत केली जाणार आहे.
असा आहे स्पर्धेचा मार्ग
10 किमी अंतरासाठी स्पर्धा सकाळी सहा वाजता कोरोनेशन क्लब येथून सुरुवात होईल. जामनेर रोडवरील नाहाटा चौफुलीपर्यंत धावत जाऊन तिथून पुन्हा वळसा घेऊन पुन्हा कोरोनेशन क्लब व पुढे आरपीडी रोडवर लिंपस क्लब पर्यंत जाऊन लिंपस क्लबहून पुन्हा मैदानावर परत असा 10 किमीचा मार्ग असेल तर पाच किलोमीटरसाठी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. कोरोनेशन क्लब ते जामनेर रोडवरील नाहाटा चौफुली व तेथून पुन्हा कोरोनेशन क्लबच्या मैदानावर परत असा मार्ग असेल तर तीन किलोमीटरसाठी सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरूवात होईल. कोरोनेशन क्लब मैदानापासून अष्टभूजा देवी मंदिर व तेथून पुन्हा परत कोरोनेशन क्लबचे मैदान असा स्पर्धेचा मार्ग असेल.


