यावल न्यायालयात रविवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन


National Lok Adalat organized at Yaval Court on Sunday यावल : यावल न्यायालयात रविवार, 3 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षानुवर्ष न्यायप्रलंबीत दावे, वादी-प्रतिवादी यांनी समोपचाराने निकाली काढावे व या राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यायालयाच्या विधी सेवा समितीकडून करण्यात आले आहे.

रविवारी होणार लोक अदालत
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये व यावल येथील दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस.बी.वाळके सह दिवाणी न्यायाधीश व्ही.एस. डामरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती व यावल वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 3 मार्च रोजी यावल न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात न्या.एस.बी.वाळके यांच्या पॅनलसमोर कामकाज चालणार आहे. या लोकन्यायालयात बँकेची, इतर वित्तीय संस्था, तालुक्यातील ग्रामपंचायत, बी.एस.एन.एल आणि विद्युत बिलांची दाखल पूर्व प्रकरणे, न्यायालयातील प्रलंबित विवाह वाद, दिवाणी व फौजदारी प्रकरणे तडजोडीसाठी मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आले आहे. लोक न्यायालयात पक्षकारांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणावर तडजोड करून वाद विवाद संपवावेत, असे आवाहन, यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या.एस.बी.वाळके यांनी पक्षकारांना केले आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !