जळगावात व्यापार्‍याची दिड लाखांची रोकड लांबवली

वाहनातून ऑईल गळती होत असल्याचे सांगून लक्ष केले विचलित


Distracted by saying that the vehicle is leaking oil जळगाव : वाहनातून ऑईल गळती होत असल्याचे भासवून भामट्यांनी व्यापार्‍याची दिड लाखांची रोकड लांबवली. जळगाव शहरातील महात्मा गांधी रोडवर ही घटना गुरूवार, 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी रात्री 11 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लक्ष विचलित करीत लांबवली रोकड
गोपाल काशीनाथ पलोड (67, रा.हरेश्वर नगर, जळगाव) हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे दाणाबाजार परिसरात दुकान असून व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार, 29 फेब्रुवारी सायंकाळी सात वाजता दुकान बंद करून गोपाल पलोड कारने घरी जाण्यासाठी निघाले असता महात्मा गांधी रोडवरून जात असतांना एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना कारमधून ऑईल पडत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांच्यासह चालकाचे लक्ष विचलित करून कारमधील एक लाख 50 हजारांची रोकडची बॅग दोघांनी लांबविली. काही कळण्याच्या आत दोघे भामटे दुचाकीवरून पसार झाले. ही घटना घडल्यानंतर गोपाल पलोड यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात रात्री 11 वाजता अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार भास्कर ठाकरे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !