शासकीय कर्मचार्यांना मोठा दिलासा : सुधारीत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू
Big relief for government employees: Revised National Pension Scheme implemented मुंबई : राज्यात 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणार्या कर्मचारी-अधिकार्यांसाठी सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय शुक्रवारी विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर करण्यात आला. या निर्णयानुसार कर्मचार्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के इतके निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसेच निवृत्तिवेतनाच्या 60 टक्के इतके कुटूंब निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे.कर्मचारी संघटनांना दिलेला शब्द पाळल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारीत करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
योजनेची तत्वे निश्चित
मुख्यमंत्री निवेदनात म्हणाले की, दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना सुधारीत करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव व सेवा विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी संघटनेसोबत चर्चा करुन सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची तत्वे निश्चित केली आहेत. त्यास अधिकारी, कर्मचारी संघटनेनेही सहमती दर्शवली आहे.








