अक्कलकुवा-चाळीसगाव बसमधून धुळ्यातील विवाहितेचे 62 हजारांचे दागिणे लंपास
62,000 jewels of a married woman in Dhule were looted from Akkalkuwa-Chalisgaon bus चाळीसगाव : अक्कलकुवा-चाळीसगाव बसमधून प्रवास करणार्या धुळ्यातील 32 वर्षीय विवाहितेचे दोन भामट्या महिलांनी 62 हजारांचे दागिणे लंपास केले. ही घटना 29 रोजी दुपारी एक ते अडीच दरम्यान मेहुणबारे-चाळीसगावदरम्यान घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दागिण्यांच्या डब्यातून लांबवले दागिणे
स्वाती मोहन परदेशी (32, धुळे) ही विवाहिता 29 रोजी अक्कलकुवा-चाळीसगाव बस (क्रमांक आठवत नाही) ने प्रवास करीत असताना मेहुणबारे ते चाळीसगाव दरम्यान महिलेच्या बाकाखाली बॅगेतून 15 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, पाच ग्रॅमच्या कानातील साखळ्या, पाच ग्रॅमची अंगठी, दोन ग्रॅमची बाळी असा एकूण 62 हजारांचा लांबवला. संशयित महिलेकडे दोन महिन्यांचे बाळ होते तर शीटखाली बसलेल्या महिलेकडे अंदाजे तीन ते चार वर्षांचे बाळ असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास सहाय्यक निरीक्षक प्रवीण दातरे करीत आहेत.

