जळगावात गांजा विक्री पूर्वीच तरुण शहर पोलिसांच्या जाळ्यात


Ganja sale in Jalgaon already in the net of young city police जळगाव  : जळगाव शहर पोलिसांनी शाहू नगरातून आठ हजार 100 रूपये किंमतीचा 324 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. याप्रकरणी मजीद चांद शेख (44, रा. इंदिरानगर, शाहूनगर) यास अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शाहूनगर परिसरातील मजीद शेख याने घरात विक्रीसाठी गांजा ठेवला असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार कर्मचार्‍यांनी शुक्रवार, 1 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता शाहूनगरात शेख याच्या घरी जाऊन पाहणी केली असता तेथे 8 हजार 100 रुपये किमतीचा 324 ग्रॅम वजनाचा अर्धवट ओला गांजा व बिया आढळून आल्या. या गांजासह वजनकाटा व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रात्री 11 वाजता हवालदार विजय निकुंभ यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. तपास सहा.निरीक्षक रवींद्र बागूल करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !