जळगावातील साहू नगरातून 20 गुटख्याचा साठा जप्त
20 stocks of Gutkha seized from Sahu Nagar in Jalgaon जळगाव : शहरातील शाहू नगरातून प्रतिबंधित 32 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवार, 1 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता केली. याप्रकरणी सायंकाळी सात वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहर पोलिस ठाण्याचे हवालदार किशोर निकुंभ व कॉन्स्टेबल तेजस मराठे हे शुक्रवार, 1 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता सुमारास पेट्रोलिंग करत असताना शाहूनगर परिसरातील अयान हसन भिस्ती (20, रा. शाहूनगर) याच्या घराची झडती घेतल्यानंतर घरात प्रतिबंधित गुटखा आढळून आला.


गुटख्याच्या या साठ्यासह रोख 32 हजार 270 रुपये, प्रत्येकी 10 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण 74 हजार 149 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रात्री 10 वाजता पोकॉ तेजस मराठे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अयान भिस्ती व अन्सार भिस्ती या दोघांविरुद्ध सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत.