चाळीसगावात बोलण्यात गुंतवत दोघांकडील एक लाख 21 हजारांची रोकड लंपास
One lakh 21 thousand cash was stolen from both of them while investing in speaking in Chalisgaon चाळीसगाव : बोलण्यात लक्ष विचलीत करीत दोघांकडील तब्ब्ल एक लाख 21 हजारांची रोकड लांबवल्याची प्रकार शहरातील राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ घडला. अज्ञात चोरट्याांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भर दिवसा झाली फसवणूक
भगवान काशीनाथ मोरे (43, रा.बहाळ, ता.चाळीसगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार, 2 मार्च रोजी भगवान मोरे हे कामानिमित्त चाळीसगाव शहरात आले असता दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चाळीसगाव स्टेशन रेाडवरील राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ असतांना त्यांच्याजवळ कापडी पिशवीतील 80 हजारांची रोकड अज्ञातांनी लांबविली. त्याचवेळी त्याच परिसरात शेनफडू आनंदा बागुल (चाळीसगाव) यांच्याजवळील 41 हजार रुपयांची रोकड लांबविली. एकाच वेळी घडलेल्या घटनांमध्ये एक लाख 21 हजार रुपये लांबवण्यात आले. अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार प्रशांत पाटील करीत आहे.

