भुसावळातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये एक कोटींच्या कामाचा शुभारंभ
25 वर्षानंतर उजळले रस्त्याचे भाग्य : नितीन धांडे यांच्या पाठपुराव्याला यश
Commencement of work worth one crore in Ward No. 18 in Bhusawal भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून एक कोटी रुपये कामांचा शुभारंभ नुकताच झाला. अष्टभूजा डेअरीचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या प्रभागासाठी आमदारांनी निधी मंजूर केला. तब्बल 25 वर्षानंतर या प्रभागातील प्लॉट भाग ते कोलते गल्ली, भवानी पेठदरम्यान रस्त्याचे डांबरीकरण होत असल्याने या भागातील नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
भूमिपूजनप्रसंगी आमदार संजय सावकारे, भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी, पिंटू कोठारी, किरण कोलते, परीक्षीत बर्हाटे, देवा वाणी, राजेंद्र नाटकर, सतीश सपकाळे, पुरुषोत्तम नारखेडे, अॅड.बोधराज चौधरी, महेंद्रसिंग ठाकूर, अजय नागराणी, निक्की बत्रा, दिनेश नेमाडे, सुरेश कोलते, प्रशांत देवकर आदींची उपस्थिती होती.








