अप अहमदाबाद-हावडा गाडीच्या वातानुकूलित बोगीला बेटावदनजीक आग : मोठी दुर्घटना टळली


Air-conditioned coach of UP Ahmedabad-Howrah train catches fire near island: major accident averted बेटावद : अहमदाबाद येथून हावडाकडे निघालेल्या गाडी क्रमांक 12833 च्या एका वातानुकूलित बोगीतून धूर निघत असल्याने प्रवासीवर्गात प्रचंड घबराट उडाली. हा प्रकार सोमवारी सकाळी 9 वाजत ाअमळनेर जवळील बेटावदजवळ घडला. प्रवाशांच्या गोटात या प्रकाराने प्रचंड थरकाप उडाला मात्र तातडीने धूर निघत असलेल्या भागात अग्निरोधक सिलिंडरचा वापर करून आग विझवण्यात यंत्रणेला यश आले.

हॉट एक्सल झाल्याने प्रकार
सूत्रांच्या माहितीनुसार अप अहमदाबाद हावडा सोमवारी सकाळी निघाल्यानंतर अमळनेर स्थानकाजवळील बेटावद स्थानकाजवळ आल्यानंतर एका वातानुकूलीत बोगीच्या खालून मोठ्या प्रमाणावर धूर निघू लागल्याने प्रवाशांनी धोक्याची साखळी ओढली. या प्रकारानंतर प्रवाशांच्या गोटात प्रचंड भीती पसरली होती मात्र स्टेशन अधीक्षक प्रमोद ठाकुर, टी.टी.ई धीरज कुमार, सी अ‍ॅण्ड डब्ल्यू विभागाचे देवेंद्र बासु, गँगमन यांनी सतर्कतेचा परीचय देत अग्निरोधक सिलिंडरचा वापर करीत पुढील अप्रिय घटना टळली. काही वेळानंतर पुढील प्रवासासाठी गाडी मार्गस्थ झाली.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !